कार्तिक आर्यनच्या बहिणीचा घोळ; किट्टूला विमानात नो एण्ट्री

 


अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो. लॉकडाउनच्या काळात तर कार्तिकने धमाल व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचं मनोरंजन केलं होत. खास करुन या काळात कार्तिकने त्याची बहिण कृतिकासोबत म्हणजेच किट्टूसोबत मजामस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यातल्या अनेक व्हिडीओत बहिण-भावंडांमधली गोड भांडणही पाहायला मिळाली. तर कधी थट्टामस्करी पाहायला मिळाली.

कार्तिक आर्यनने नुकताच त्य़ाच्या बहिणीचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ असून यात कृतिका बाहेर जाण्यासाठी विमानतळावर पोहचल्याचं दिसतंय. मात्र आत जाण्याआधीच ती माघारी फिरली.

याच कारण असं की किट्टूने १२ मार्चचं तिकीट काढलं होतं. मात्र, ती एक महिना आधीच तिचं सामान घेऊन विमानतळावर पोहोचली. त्यामुळे तिला पुन्हा मागे फिरावं लागलं. विशेष म्हणजे आपण एक महिना आधीच विमानतळावर पोहोचलोय याची कल्पनाही किट्टूला नव्हती. विमानतळावर सिक्युरिटी चेकिंगदरम्यान एका गार्डने तिचं तिकीट पुढील महिन्याचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर कपाळावर हात मारत किट्टूला परत घरी जावं लागलं.

कृतिकाने घातलेला हा सगळा घोळ कार्तिकच्या लक्षात आला होता आणि म्हणूनच त्यानं कृतिकाच्या फजितीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ काढत असताना कार्तिक आणि त्याची आई दोघांनाही हसू आवरण कठीण झाल्याचं लक्षात येतंय. ‘किट्टूसाठी तारीख म्हणजे फक्त साधे आकडे आहेत’ असं कॅप्शन कार्तिकने या व्हिडीओला दिलंय. किट्टूच्या फजितीचा हा व्हिडीओ कार्तिकने स्वत: शेअर केला आहे.



 

Post a Comment

0 Comments