फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेता मानसा वाराणसी ठरली.
- मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही २३ वर्षांची आहे. यापूर्वी तिने 'मिस तेलंगणा' हा खिताब जिंकला होता. मिस इंडिया ठरल्याने आता २०२१ डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये मानसा भारताचं प्रतिनिधित्तव करेल.
आई, आजी आणि धाकटी बहीण आयुष्यातील तीन सर्वात प्रभावी व्यक्ती असल्याचं मानसा म्हणते. याशिवाय मानसा मिस वर्ल्ड २००० ची विजेता अभिनेत्री प्रियांका चोप्राला प्रेरणादायी मानते. प्रियंकाने नेहमीच कठोर मेहनत घेत विविध क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे, असं मानसा म्हणते.
Vasavi College of Engineering मधून मानसाने शिक्षण पूर्ण केलं असून तिला संगीत, योगा, निसर्गाची आवड आहे.
'मिस इंडिया' चा मान पटकावणारी ती तेलंगणामधील पहिली मुलगी ठरली आहे.
मानसासोबत खुशी मिश्रा, मान्या सिंह, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या. मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाचा मिस इंडिया कॉन्टेस्ट ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता. अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती.
मिस इंडिया ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया, चित्रांगदा सिंह, पुलकित सम्राट आणि Falguni व Shane Peacock यांचा समावेश होता. तर, हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे
0 Comments